Home संगमनेर संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

Breaking News | leopard attack: कोपीत झोपलेल्या महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला करुन जखमी केल्याची घटना.

Woman injured in leopard attack in Sangamner taluka

संगमनेर:  तालुक्यात बिबट्यांचे हल्ले  सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. सोमवारी (दि. 26 ऑगस्ट) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास वडगाव लांडगा येथे कोपीत झोपलेल्या महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने  बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावला आहे.

याबाबत वन विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की मेंढ्या चारण्यासाठी जांभुळवाडी येथील खेमनर कुटुंबीय वडगाव लांडगा परिसरात आलेले आहे. दरम्यान, मेंढ्या चारुन आल्यानंतर नेहमीप्रमाणे कोपीमध्ये शारदा राहुल खेमनर (वय 35) झोपी गेलेल्या होत्या. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत उजव्या गालावर चावा घेत जखमी  केले आहे.

या घटनेची माहिती स्थानिकांनी वनपरिक्षेत्र भाग 2 चे अधिकारी सागर केदारे यांना दिली. त्यांनी तत्काळ कर्मचार्‍यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर जखमी महिलेला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाल्याने वन विभागाने  तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावला आहे.

Web Title: Woman injured in leopard attack in Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here