Home Crime News बापरे ! ‘एवढीशा’ पैशांसाठी डोक्यात लाटणं घालून हत्या ?

बापरे ! ‘एवढीशा’ पैशांसाठी डोक्यात लाटणं घालून हत्या ?

Ghatkopar news

मुंबई: घाटकोपर (Ghatkopar) येथे एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात लाटणे घालून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या पाच हजार रुपयांसाठी तिने दुसऱ्या महिलेचे जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. रेखा धोबी (२५) असे मृत महिलेचे नाव असून ममता उके (५१) या महिलेने रेखाची हत्या केली आहे.

मृत रेखाचे पती आशिष यांनी २० टक्के व्याजाने ममताकडून ५ हजार रुपये घेतले होते. या पैशाचे व्याज त्याने त्या महिलेला दिले होते. मात्र ममताला त्याच्याकडून व्याजाने दिलेली पाच हजार रुपयांची मुद्दल देखील परत हवी होती. यासाठी ममता वारंवार रेखा आणि आशिष या नवरा बायकोकडे पैशाची मागणी करत होती. पैसे परत मिळवण्यासाठी ममता ही रेखाच्या घरी गेली होती. तिने पुन्हा पैशांचा तगादा लावला. यावरून त्यांच्यात प्रचंड बाचाबाची झाली. यानंतर ममताने रागाच्या भरात घरातील लाटणे घेऊन रेखाच्या डोक्यात जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात रेखा जखमी झाली आणि त्यातच रेखाचा मृत्यू झाला. यानंतर माहिती मिळताच घटनास्थळी येऊन पंचनामा करीत पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून २५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. अधिक तपास केला असता, आरोपी महिलेचा आणि मृत महिलेच्या पतीमध्ये पैशांचा व्यवहार झाला होता. यामुळे आरोपी महिला ही रेखा यांच्या घरी गेली होती. व त्यानंतर हा सर्व प्रकार घडला होता. सुरुवातीला बेशुद्ध झालेल्या रेखाला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिचा मृत्यू झाला, असे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

Web Title : Woman killed for Rs 5,000 in Ghatkopar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here