संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर कारच्या धडकेत महिला ठार तर दोन जखमी
Ahmednagar | Sangamner News: नाशिक पुणे महामार्गावर माहुली परिसरातील एकल घाट परिसरात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात (Accident) एक महिला जागीच ठार तर दोन जण जखमी.
संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे महामार्गावर माहुली परिसरातील एकल घाट परिसरात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी २६ डिसेंबर रोजी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकलापूर पवार मळा येथील कुटुंब दुचाकीहून संगमनेरकडून अकलापूर येथे चालले होते. ते मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान एकल घाट येथे आले असता पाठीमागून भरधाव आलेल्या कार क्रमांक एम.एच. १२ आर. एफ.५५८४ हिने दुचाकी क्रमांक एम.एच. १७ बी.सी. २३५५ हिला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात रतनबाई ज्ञानेश्वर गवळी जागीच ठार झाल्या तर सुरेखा बर्डे व देवगण गायकवाड हे जखमी झाले. दुचाकीला कारने धडक दिल्याने दुचाकी थेट साईट बाजूला पडून दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती समजताच डोळासने महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय मंडलिक अरविंद गिरी आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मयत यांना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर व खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
Web Title: Woman killed, two injured in car collision Accident in Sangamner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App