अहमदनगर: वन विभागाच्या कर्मचार्याकडून महिलेचा विनयभंग
Breaking News | Ahmednagar: मेंढपाळ महिलेच्या पालात घुसून विनयभंग करणार्या वन विभागाच्या कर्मचार्यास चार दिवसांत अटक करून कारवाई न केल्यास चक्काजाम आंदोलन.
राहुरी: राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथे मेंढपाळ महिलेच्या पालात घुसून विनयभंग करणार्या वन विभागाच्या कर्मचार्यास चार दिवसांत अटक करून कारवाई न केल्यास 16 ऑगस्ट रोजी सकल धनगर समाजाच्यावतीने राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी शिवारात 11 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान वन विभागाचा कर्मचारी आरोपी सागर वाकचौरे हा एका मेंढपाळ महिलेच्या पालात घुसला. त्यानंतर त्याने पीडित महिलेचा विनयभंग केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सागर वाकचौरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी वाकचौरे हा पोलीस ठाण्याच्या आवारात असताना त्याला अटक करण्याऐवजी त्याची खोटी फिर्याद घेऊन मेंढपाळ बांधवावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. ही बाब अतिशय अन्यायकारक आहे. सदर आरोपीस तात्काळ अटक करून त्याचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार संध्या दळवी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अन्यथा 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता शेळ्या मेंढ्यांसह मेंढपाळ बांधव व सकल धनगर समाज नगर-मनमाड रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वर बाचकर यांनी दिला आहे. यावेळी राहुरी येथील वन विभाग कार्यालयाच्या आवारात धनगर बांधवांनी ठिय्या मांडून आरोपी सागर वाकचौरे याला सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली.
Web Title: Woman molested by forest department employee
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study