महिला पोलीस कॉन्स्टेबलचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू
Breaking News | Accident: रेल्वे स्थानकावर एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला लोकल ट्रेनमधून पडून जीव गमवावा लागला.
मुंबई: नाहूर रेल्वे स्थानकावर भयानक अपघाताची घटना घडली आहे. ५ मार्च रोजी नाहूर रेल्वे स्थानकावर एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला लोकल ट्रेनमधून पडून जीव गमवावा लागला. अश्विनी डोमाडे ( वय 27 वर्ष) असं या महिला पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.
५ मार्च रोजी अश्विनी डोमाडे पतीसोबत रेल्वेतून प्रवास करत होती. प्रवासादरम्यान ती रेल्वेच्या दरवाज्यात उभी राहिली. ट्रेन सुरू असताना धक्का लागल्याने अश्विनी खाली पडली. त्याच क्षणी विरुद्ध बाजूने दुसरी गाडी आली आणि तिला धडक दिली. या घटनेत महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनीचा मृत्यू झाला आहे.
अश्विनीच्या पतीने रेल्वे पोलीस आणि एका पोर्टरच्या मदतीने तिला रुग्णवाहिकेतून फोर्टिस रुग्णालयात नेलं. दुपारी 2.10 वाजता अश्विनीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला होता.
अश्विनीच्या पतीने तिचा हात धरून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तरीही ती घसरली. तिचं डोकं डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनला धडकलं. तिच्या पतीने लगेच खाली उडी मारली आणि तिला प्लॅटफॉर्मवर आणलं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
Web Title: Woman police constable dies after falling from running local
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study