Home महाराष्ट्र शेंदूर लावायला वाकलेल्या मुलाला महिलेने विहिरीत ढकलले,नरबळीचा प्रयत्न

शेंदूर लावायला वाकलेल्या मुलाला महिलेने विहिरीत ढकलले,नरबळीचा प्रयत्न

Breaking News | Crime: महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून  नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना.

woman pushed the boy bent to plant the shendur into the well, an attempt at human sacrifice

वर्धा : वर्धा येथून नरबळी देण्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून  नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. वर्ध्यातील नालवाडी परिसरात शेजारी राहणाऱ्या महिलेने एका बारा वर्षीय बालकाला विहिरीत ढकलल्याची घटना घडली आहे. विहिरीला शेंदूर लावायला सांगत शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलून महिलेने पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. नशीब बलवत्तर म्हणून मुलाने विहिरीतील दोरीचा आधार घेत स्वतःचा बचाव केला आहे. . या प्रकरणी वर्धा पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

नालवाडीच्या नागसेन नगर येथे राहणाऱ्या शारदा राजू वरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलावून विहिरीजवळ नेले. बालक परिसरात पतंग उडवत होता, काहीतरी काम आहे असा बहाणा करीत मुलाला सोबत नेले. विहिरीजवळ पोहचल्यावर विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. वाकलेल्या बालकाला लगेच विहिरीत ढकलले. मुलगा विहिरीत असलेल्या दोरीच्या सहाय्याने कसाबसा चढत वर आला आणि आपले प्राण वाचवीले. घरी पोहचलेल्या बालकाने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितल. आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा राजू वरके हिच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून नरबळी व इतर अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित मुलगा हा वर्ध्यात आपल्या आजी -आजोबाकडे शिकायला आहे. तो बाहेरून घरी परतल्यावर त्याचे कपडे भिजलेले होते. घाबरलेल्या अवस्थेत घरी परतलेल्या पीडित बालकाची कुटुंबीयांनी विचारणा केली. विचारणा केल्यावर घडलेला प्रकार सांगितला. वर्धा पोलिसांनी अपराध क्रमांक 363,307, भादवी सहकलम 3 महाराष्ट्र नरबळी इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस महिला शारदा हिचा शोध घेत आहे.

Web Title: woman pushed the boy bent to plant the shendur into the well, an attempt at human sacrifice

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here