अहमदनगर: रस्त्यावर जाणाऱ्या महिलेवर अत्याचार
Breaking News | Ahmednagar Crime: रस्त्यावर एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पीडितेच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा.
अहमदनगर: तारकपूर बस स्थानकाशेजारील रामवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि. ३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. उपनगरात राहणाऱ्या पीडित महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि. ५) पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एक वकील, एक पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. आफ्रोज शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. जिल्हा रुग्णालय), कुलकर्णी वकील (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), पोलीस अधिकारी विकास वाघ, आरती वाघ (दोघांची पूर्ण नावे, पत्ता माहिती नाही) व आफ्रोजचा मामा (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी रस्त्याने जात असताना आफ्रोज शेख व आरती वाघ यांनी फिर्यादीचे पाय धरले व कुलकर्णी वकील, पोलीस अधिकारी विकास वाघ, आफ्रोजचा मामा यांनी अत्याचार केला. फिर्यादीने आरडाओरडा करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आफ्रोज शेख व आरती वाघ यांनी त्यांना पुन्हा शिवीगाळ, मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास महिला सहा. निरीक्षक श्रीवास्तव करीत आहेत.
Web Title: woman walking on the street was assaulted
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study