Home अहमदनगर श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे महिलेचा दबून मृत्यू

श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे महिलेचा दबून मृत्यू

Ahmednaga News: उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे त्याखाली दबून रस्त्यालगत चाललेल्या महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना.

Ahmednagar News woman was crushed to death after a truck full of sugarcane overturned 

श्रीरामपूर:  श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळ्यात उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे त्याखाली दबून रस्त्यालगत चाललेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बाभळेश्वर-श्रीरामपूर-नेवासा मार्गे वळविलेल्या अवजड वाहतुकीचा ही महिला पहिला बळी ठरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उसाने भरलेला (क्र. एम.एच.12 एच.सी.9666) हा दहा टायर ट्रक श्रीरामपूरकडून बाभळेश्वरकडे 6 वाजण्याच्या सुमारास जात होता. खंडाळ्यातील गणपती मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावरील कमानीजवळ ट्रक आल्यानंतर समोरुन येत असलेल्या अवजड वाहनामुळे चालकाने आपला ट्रक कडेला घेतला असता डाव्या बाजूला असलगल्या उतारामुळे उसाने भरलला हा ट्रक डाव्या बाजूने झुकून उलटला. त्याचवेळी रस्त्याच्या कडेने जाणारी खंडाळा येथील रहिवासी उषाबाई बाळासाहेब विघावे ही महिला ट्रकमधील उसाखाली दबली गेली.

तसेच मोटारसायकलवर जाणारे नर्सरी (बेलापूर) येथील दोघेजण जखमी झाले. मोठ्या वर्दळीत अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. घटनेत उसाखाली दबलेल्या महिला व पुरुष यांना काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न करून महिलेला तसेच दोन्ही जखमींना बाहेर काढले.

गावातील अमोल साबदे व मरकडे यांनी जेसीबी आणून ऊस बाजूला करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील वाहतूक लांब अंतरापर्यंत ठप्प झाली होती. यावेळी पोलीस यंत्रणेकडून वाहतूक काही काळ थांबून सुरळीत करण्यात आली.

Web Title: Ahmednagar News woman was crushed to death after a truck full of sugarcane overturned 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here