अहमदनगर: घरात घुसून महिलेचा कुऱ्हाडीने खून
Breaking News | Ahmednagar: मध्यरात्री दोघा तरुणांनी घरात घुसून एका महिलेचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून.
श्रीरामपूर: तालुक्यातील निपाणी वाडगाव येथे गुरुवारी (दि.१) मध्यरात्री दोघा तरुणांनी घरात घुसून एका महिलेचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. या घटनेत कुटुंबातील दोघेजण जखमी झाले आहेत. शहर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. मयत महिलेचे नाव शमा शेख नूर पठाण असे आहे.
पोलिसांनी आकाश इंद्रभान बर्डे (रा. निपाणी वाडगाव) तसेच एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याप्रकरणी मुन्ना शेख नूर पठाण (वय ३४, रा. आदर्शनगर, श्रीरामपूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पठाण यांची आई शमा पठाण या भाऊ युनूस तसेच भाचा साहिल व भाची महेक यांच्यासोबत निपाणी वाडगाव येथे राहतात. आरोपींच्या हल्ल्यात महेक सय्यद व साहिल सय्यद हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या गळ्याला व डोक्याला जखमा झाल्या आहेत. मुन्ना पठाण हे घरी पोहोचल्यानंतर त्यांनी शमा पठाण यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आले. आरोपींच्या या कृत्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख तपास करीत आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, यांनी घटनास्थळी भेट दिली.
नेमकी माहिती अशी की, मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान आरोपी पठाण यांच्या घरी आले. त्यांनी साहिल याच्या डोक्यात कुहाडीने घाव घालण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचविण्यासाठी शमा पठाण या मध्ये आल्या असता, त्यांना कुन्हाडीचा घाव लागून त्या जागेवर कोसळल्या. यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
Web Title: woman was killed with an ax after breaking into the house
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study