धक्कादायक! पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये बुडवून महिलेची हत्या
Mumbai Crime : पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये बुडवून वृद्ध महिलेची हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे, आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई: पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये बुडवून वृद्ध महिलेची हत्या केल्याचा प्रकार मुंबईच्या मालाड परिसरात घडला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेनेच प्रियकर आणि मुलाच्या सहाय्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येनंतर घरकाम करणाऱ्या महिलेने सोन्याची चैन, मोबाईल फोन आणि स्मार्ट वॉच घेऊन पळ काढला आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या मालाड परिसरात राहणाऱ्या या वृध्द महिलेची तिच्याच घरी काम करणाऱ्या महिलेने प्रियकर आणि मुलाच्या मदतीने कट रचून हत्या केली आहे. मारी सिलिन विल्फ्रेड डिकोस्टा असे या 69 वर्षीय वृद्ध महिलेचे नाव असल्याचे समोर आले आहे. डिकोस्टा यांच्या घरी काम करणाऱ्या शबनम शेखने त्यांची बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत तोंड बुडवून निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी मालाड पोलीस आणि गुन्हे शाखेने शबनम शेख, तिचा मुलगा आणि प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
Web Title: woman was Murder by drowning in a bucket full of water
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App