Home क्राईम धक्कादायक!  भाच्याच्या  वाढदिवसाला बोलावून महिलेवर बलात्कार

धक्कादायक!  भाच्याच्या  वाढदिवसाला बोलावून महिलेवर बलात्कार

Pune Crime: एका हॉटेलमध्ये बोलवले. तेथे पीडितेवर बलात्कार (Raped) करून, तिचे फोटो मित्राला पाठवले.

woman was raped by inviting her to her niece's birthday party

पुणे : पुण्यात महिलेवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होताना दिसून येत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगून मित्राने २९ वर्षीय महिलेला कोंढव्यातील एका हॉटेलमध्ये बोलवले. तेथे पीडितेवर बलात्कार करून, तिचे फोटो मित्राला पाठवले. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी २९ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून कलीम सलीम शेख (वय ४५) आणि आश्रफ शेख (२५) या दोघांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय पीडितेला तिचा मित्र कलीम शेख याने फोन करत भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगितले. त्यानुसार पीडिता येवलेवाडी, कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये गेली. तेथे आरोपीने पीडितेवर अत्याचार केले. पीडितेला मारहाण करत तिच्या फोटोंचे स्क्रिनशॉट आश्रफ शेख याला दाखवले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार २०१० ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

Web Title: woman was raped by inviting her to her niece’s birthday party

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here