Home अहमदनगर अहमदनगर: माहेरी आलेली महिला अचानक झाली बेपत्ता

अहमदनगर: माहेरी आलेली महिला अचानक झाली बेपत्ता

Breakng News | Ahmednagar: पती बरोबर जमत नसल्याने १ महिन्यापासून माहेरला आलेली २४ वर्षीय विवाहिता एकरुखे येथून बेपत्ता.

woman who came home suddenly disappeared

राहाता | Rahata: पती बरोबर जमत नसल्याने १ महिन्यापासून माहेरला आलेली २४ वर्षीय विवाहिता एकरुखे येथून बेपत्ता झाली आहे.

कविता किरण कणसे असे या बेपत्ता असलेल्या महिलेचे नाव आहे. बेपत्ता झाल्याची खबर तीची आई सुनीता साईराम उंदरे यांनी राहाता पोलीस ठाण्यात दिली आहे. बेपत्ता असलेल्या कविता हिचा विवाह १० वर्षांपूर्वी मातुलठाण येथील किरण कणसे यांच्याबरोबर झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. कविता आणि तीच्या पतीचे जमत नसल्याने एक महिन्यापूर्वी पतीच्या सांगण्यावरून तीला एकरुखे येथे माहेरी आणण्यात आले होते.

८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उठून भावाला चहा करून दिला व तो डेअरीवर कामाला गेल्यानंतर ती घरात दिसून आली नाही. तीची बॅगही घरात दिसून आली नाही. एकरुखे गावात नातेवाईकांकडे शोध घेतला असता, ती कोठेही मिळून आली नाही. त्यामुळे आपली खात्री झाली, ती मिसींग झाली आहे. या खबरीवरून राहाता पोलिसांनी मिसींग रजि. क्र. १०/२०२४ प्रमाणे खबर नोंदवून घेतली आहे.

कविता हीचा चेहरा गोल, नाक सरळ, रंगाने गोरी, मजबूत बांधा, अंगात काळ्या रंगाची सहावार साडी, कपाळावर टिकली गोंदलेली. पायात सॅण्डल असे तीचे वर्णन असून घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेली आहे. या प्रकरणाचा तपास राहाता पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार दिलीप तुपे करत आहेत.

Web Title: woman who came home suddenly disappeared

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here