Home नाशिक महिला टेरेसवर गेली अन पाच फूट लांब उडाली, मोठा आवाज ऐकून सर्व...

महिला टेरेसवर गेली अन पाच फूट लांब उडाली, मोठा आवाज ऐकून सर्व  धावत आले

Nashik News:  घराच्या टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा जोरदार शॉक लागल्याची घटना.

a woman who went to dry her clothes on the terrace of her house got a severe electric shock

नाशिक: नाशिकमध्ये एक धक्कादायक  घटना समोर आली आहे.  घराच्या टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा जोरदार शॉक लागला आहे. यात त्या 60 टक्के भाजल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. महावितरणाचा  उघड्यावर असलेल्या वायरमुळे शॉक लागला आहे. जखमी महिलेच्या कुंटुंबियांनी महावितरणच्या  च्या गलथन कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

नेमकी काय घडल?

राणी दशरथ चव्हाण असे शॉक लागून जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. राणी चव्हाण या 60 टक्के भाजल्या गेल्या आहेत. राणी दशरथ चव्हाण या मनमाड येथून वडिलांच्या घरी आल्या होत्या.  धुतलेले कपडे सुकत घालण्यासाठी राणी चव्हाण टेरेसवर गेल्या होत्या. यावेळी त्यांचा अचानक टेरेसवरून जाणाऱ्या एमएसईबीच्या वायरचा शॉक लागला. यामुळे त्या पाच फुट लांब फेकल्या गेल्या. परिसरातील नागरिकांना आणि घरातील सदस्यांना मोठा आवाज आल्याने घरातील सर्व मंडळी बाहेर धावले.

त्यांना विजेचा जोरदार झटका बसला होता. त्यांना  वडिलांनी तात्काळ त्यांना अशोक नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार  उपचार सुरु आहेत.

Web Title: a woman who went to dry her clothes on the terrace of her house got a severe electric shock

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here