जळत्या सरणावरुन बाजूला फेकला महिलेचा मृतदेह; धक्कादायक कारण
Breaking News | Pune: जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार.
पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावत घडलाय. स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आलय. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हे खबळबजनक कृत्य करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
अक्षरशः वृद्ध महिलेचा मृतदेह जळत असताना मृतदेह बाहेर काढून फेकून देण्यात आला आहे. रविवारी रात्री अत्यंविधी उरकून नातेवाईक घरी परतल्यानंतर नेरे गावातील प्रकाश सदाशिव बढे या संशयित व्यक्तीने स्मशानभूमीमध्ये जात हा प्रकार केलाय. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार करताना संबधित व्यक्तीला बघितल्यानं ही घटना उघडकिस आलीय. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत, त्याचं हॉटेल जाळलंयं.
या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून ही तणाव परिस्थिती नियंत्रणात आणली. या विचित्र घटनेत मृतदेहाच्या झालेल्या हेळसांड झाल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्याचं कामं सुरू आहे.
Web Title: woman’s body was thrown aside from the burning fire
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study