धक्कादायक! महिलेच्या प्रियकराने तीच्या 14 वर्षीय मुलीवर अत्याचार, विवस्त्र नाचवत बनवला व्हिडीओ
Crime News: १० वर्षांपासून लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या प्रियकराने तीच्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार (abused) केल्याचा संतापजनक प्रकार समोर
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पुंडलिकनगर परिसरात ही धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली. गेल्या १० वर्षांपासून लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या प्रियकराने तीच्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संतापजनक म्हणजे, या नराधमाने मुलीला विवस्त्र करत तीचा मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रीकरणही केले होते.
दरम्यान, सततच्या अत्याचाराला कंटाळून या मुलीने थेट पोलिसांत धाव घेतली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी दोन वर्षांची असतांना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. त्यांनतर तीचा अशपाक गफ्फार शेख सोबत दुसरा विवाह झाला. मात्र, अशपाकची नियत ढळली आणि त्याने काही दिवसांपासून मुलीवर अत्याचार सुरू केले. तिला सातत्याने दुधात औषध देऊन तो अत्याचार करत राहिला. तसेच, तीला विवस्त्र करत तीचा मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केले. या सर्व अत्याचाराने पीडित मुलगी घाबरून गेली होती. त्यामुळे, अखेर मुलीने पुंडलिकनगर ठाण्यात धाव सर्व प्रकार कथन केला, त्यानुसार पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Woman’s boyfriend abused her 14-year-old daughter
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App