नोकरीचे आमिष दाखवून देहव्यवसाय, परराज्यातील तीन महिला आणि तीन युवतींची सुटका
Nagpur Crime: स्पा च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायचा prostitution गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला.
नागपूर : नागपूरच्या परिसरात स्पा च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मधील तीन महिला आणि तीन युवतींची पोलिसांनी सुटका केली. या देहव्यापार प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यातील युवती आणि महिलांना आमिष दाखवून या ठिकाणी आणलं जायचं आणि त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जायचा. या स्पा चा मालक हा मुंबईचा रहिवासी असून, तो नागपुरात हा व्यवसाय चालवत होता.
सदर परिसरातील या स्पामध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या देहव्यापारासाठी वेगवेगळ्या राज्यातील मुली आणि महिला आणण्यात येत होत्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत डमी ग्राहक त्या हॉटेलच्या मध्ये पाठवला आणि त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली.
कारवाई दरम्यान काही आक्षेपार्ह वस्तू या ठिकाणी पोलिसांना मिळून आल्या. त्याचप्रमाणे तीन मुली आणि तीन महिला सुद्धा या ठिकाणी दिसून आल्या. या महिला आणि मुली पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मधील असल्याचे पुढे आलं या महिलांची आणि मुलींची सुटका करून पोलिसांनी स्पा चा मॅनेजरसह दोन जणांना अटक केली. सदर सारख्या पॉश वस्तीमध्ये हा व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच या ठिकाणी येणारे कस्टमर हे नियमित स्वरूपाचे आणि ओळखीचे असायचे. त्यामुळे बाहेर माहिती जाण्याची भीती कमी होती, मात्र याचा आता पर्दाफाश झाला आहे.
Web Title: women and three young women were rescued from foreign countries by luring them into prostitution
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App