Home Crime News दुकानात कपडे खरेदीचा बहाणा करून चोरी करणाऱ्या सराईत महिलांना अटक

दुकानात कपडे खरेदीचा बहाणा करून चोरी करणाऱ्या सराईत महिलांना अटक

Ulhasnagar crime

उल्हासनगर : कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातील एका व्यक्तीच्या पर्स मधून २४ हजार रुपये आणि महागडा मोबाईल चोरी करून काही महिला पसार झाल्या होत्या. मात्र या चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याच कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी चोरी करणाऱ्या महिलांचा शोध सुरू केला होता. अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि गोंदलेल्या प्रकारामुळे उलगडा करून सराईत महिलांना बेड्या ठोकल्या.

उल्हासनगर (Ulhasnagar) मधील एका कपड्याच्या दुकानात कपडे खरेदीचा बहाणा करून काही महिलांनी रश्मी मोनानी यांच्या पर्स मधून २४ हजारांची रोख रक्कम आणि महागडा मोबाईल फोन लंपास करून दुकानातुन पळ काढला होता. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलिसांनी लगेचच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपास सुरू केला होता.

यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी केलेल्या चोरीची कबुली दिली. पोलिसांनी महिला आरोपींची माहिती काढली असता मुंबई तसेच नवीमुंबई मधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १३ पेक्षा जास्त गुन्हे (Crime) नोंद असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

Web Title : Women arrested for shoplifting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here