Breaking News | Sangamner Crime: रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढण्याच्या कामादरम्यान महिला सरपंच शुभांगी रमेश पवार यांना मारहाण झाल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील मंगळापूर येथे रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढण्याच्या कामादरम्यान महिला सरपंच शुभांगी रमेश पवार यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजता घडली.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दीपक वाळे, खंडू वाळे, अजित वाळे, तीन महिला यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरपंच शुभांगी पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला असता, तर ही घटना टळू शकली असती, असे म्हटले आहे.
Web Title: Women sarpanch beaten in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News