शेतात काम करताना जवळीक साधली, शेतातच वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, अश्लिल व्हिडिओ बनवला अन….
Jalgaon Crime: कधी एकाने तर कधी दोघांनी सतत अत्याचार (rape) केल्याचा धक्कादायक प्रकार.
जळगाव : शेतात काम करताना अल्पवयीन मुलीशी जवळीक साधली. त्यानंतर मुलीवर शेतातच वेगवेगळ्या ठिकाणी नेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच या अश्लिल कृत्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर कधी एकाने तर कधी दोघांनी सतत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार करण्यात येत होते. या सततच्या अत्याचारातून एरंडोल येथील एका परिसरातील पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात रविवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनंतर तीन संशयितांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. बारकु उर्फ प्रविण बाळू पाटील, पप्पु उर्फ शुभम बापू पाटील (दोघे रा. सावखेडा तुर्क ता. पारोळा) आणि भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (रा. सावखेडा होळ ता. पारोळा) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडिता पारोळा तालुक्यातील ज्या शेत शिवारात कामाला जात होती, त्या-त्या शेतात कामाला जाऊन बारकु उर्फ प्रवीण पाटील, पप्पु उर्फ शुभम बापू पाटील, पप्पू उर्फ भावश्या भाऊसाहेब वसंत पाटील यांनी पीडितेशी जवळीक साधली. त्यानंतर शेतातच वेगवेगळ्या ठिकाणी नेत कधी एकाने तर कधी दोघांनी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते आणि दिला धमकी देत होते. हे कोणाला सांगू नको नाहीतर तुझा व्हिडिओ आम्ही केलेला आहे. तो व्हीडीओ सर्वांना दाखवून तुझी बदनामी करू, अशी धमकी भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील हा देत होता. धमकी देत गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून मुलीवर अत्याचार सुरू होते.
पीडित मुलीच्या पोटात ७ ते ८ दिवसांपासून दुखत होते. त्यामुळे तिने याबाबत तिच्या आईला सांगितले. तिला आईने एरंडोल येथील एका खासगी डॉक्टरकडे ११ एप्रिलला तपासणीसाठी नेले. यावेळी पीडिता ही १६ आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले.
मुलीच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी पारोळा पोलिसांत पोक्सो, अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.
Web Title: working in the field, Rape at different places in the field, made obscene videos
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App