Home Crime News शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात गोळ्या घालून हत्या

शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात गोळ्या घालून हत्या

Yavatmal Crime

Yavatmal Crime : तालुक्यातील भांब राजा येथील शिवसेना पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनील नारायणराव डिवरे यांची त्यांच्या राहत्या घरात तीन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर कुऱ्हाडीचे वार देखील करण्यात आले. यावेळी तीन राऊंड फायर झाल्याची माहिती आहे.

काल रात्री गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सुनील नारायणराव डिवरे (४०) रा.भांब राजा असे गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सुनील नारायणराव डिवरे हे यवतमाळच्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. तसेच भांब राजा ग्रामपंचायतीत सदस्य देखील होते. गोळीबार झाल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत अद्याप कसलीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात डिवरे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. हत्या झाल्यानंतर काही काळ भांब राजा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सायंकाळी सुरु केली होती.

Web Title : Yavatmal Crime : Shiv Sena office bearer shot dead in his residence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here