Home अहमदनगर पाहुणे म्हणून येता तर पाहुण्यासारखे राहा, भाडेकरू बनू नका, विखेंचा नवा न...

पाहुणे म्हणून येता तर पाहुण्यासारखे राहा, भाडेकरू बनू नका, विखेंचा नवा न घेता टोला

Ahmednagar News:  केवळ आरोप-प्रत्यारोप करून चालत नाहीत. ज्यांना यापूर्वी महसूलमंत्रिपदाची संधी मिळाली, त्यांना जिल्ह्यासाठी काहीही करता आले नाही. Radhakrishan Vikhe Patil.

you come as a guest, stay as a guest, don't become a tenant, don't be a tenant Vikhe Patil

राहाता : जे आपल्या तालुक्यात पिण्याचे पाणी देऊ शकत नाहीत, त्यांनी इकडे येऊन विकासाच्या गप्पा मारू नयेत. त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. तरीही पाहुणे म्हणून येता तर या. मात्र पाहुण्यासारखे राहा, भाडेकरू बनण्याचा प्रयत्न करू नका, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.

येथील मुस्लिम, ख्रिश्चन, गोसावी आणि लिंगायत समाजास दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विखे पाटील यांचा या समाजांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

कार्यक्रमापूर्वी विविध विकासकामांचे भूमिपूजन, तसेच हुतात्मा अनिलकुमार निकाळे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते.

विखे पाटील म्हणाले, की मुस्लिम, ख्रिश्चन, गोसावी आणि लिंगायत समाजाकरिता सेवाभावी काम करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची गेल्या वीस वर्षांपासूनची दफनभूमीच्या जागेची मागणी पूर्ण करता आली. यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची साथ लाभली.

शिर्डी येथे कार्यान्वित झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय ही उत्तर नगर जिल्ह्याकरिता मोठी उपलब्धी आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर होईल. विकासाचे प्रकल्प काम करून उभे करावे लागतात. केवळ आरोप-प्रत्यारोप करून चालत नाहीत. ज्यांना यापूर्वी महसूलमंत्रिपदाची संधी मिळाली, त्यांना जिल्ह्यासाठी काहीही करता आले नाही.

Web Title: you come as a guest, stay as a guest, don’t become a tenant, don’t be a tenant Vikhe Patil

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here