तुमच्या मुला-मुलींचा छंद पुरवला तो चालतो, दुसऱ्याच्या मुलाची का काळजी करता तुम्ही? विखे पाटलांचे थोरातांना प्रत्युत्तर
Breaking News | Sangamner: विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे शाब्दिक वार.
संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यात दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे शाब्दिक वार ऐकायला मिळत आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Thorat vs Vikhe)
बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांच्याबाबत म्हटले होते की, ते मोठ्याचं लाडकं लेकरू आहे. त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे. पक्षाने नाही तर तो पालकाने पुरवला पाहिजे. ते दोन ठिकाणी म्हटले आहेत. त्यांचा छंद पुरवण्यासाठी ते दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात. यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल, असे म्हणत त्यांनी सुजय विखे पाटलांची फिरकी घेतली होती.
यावरून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आमच्या मुलाचा किती छंद पुरावायचा, काय करायचं, हे मला बाळासाहेबांनी शिकवण्याची गरज नाही. तुम्ही आपल घरदार राजकारणात उतरवलच आहे. तुमच्या घरातल्या मुला-मुलींचा छंद पुरवला तो चालतो. दुसऱ्याच्या मुलाची का काळजी करता तुम्ही? संगमनेरमध्ये दहशतीच राजकारण फार वेळ चालणार नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी बाळासाहेब थोरातांना दिले आहे.
Web Title: you provide your children’s hobby, why do you worry about someone else, Vikhe Thorat
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study