Home अहमदनगर अहमदनगर: आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार

अहमदनगर: आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार

Breaking News | Ahmednagar Crime: आई वडीलांना जिवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी तरुणीवर अत्याचार (abuse) केल्याची घटना.

Young girl was abused by threatening to kill her parents

राहुरी: आई वडीलांना जिवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकिस आली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, ती राहुरी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून इयत्ता १२ वीला असताना महाविद्यालयातील ओम सचिन फुगारे या तरुणाशी तीची ओळख झाली. यानंतर या तरुणाने मुलीशी जवळीक करून सन-२०२३ च्या सप्टेंबर महिन्यात मुलगी महाविद्यालयात जात असताना तीला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अडवून माझ्याबरोबर फिरायला चल, असे म्हणाला. मात्र, मुलीने त्याला नकार दिल्याने मी तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देऊन तीला त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीवर बसून नगर-मनमाड महामार्गावरील एका लॉजवर नेऊन इच्छा नसताना जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर या तरुणाने त्या मुलीच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केले. मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरून आरोपी ओम सचिन फुगारे, रा. राहुरी खुर्द, ता. राहुरी. याच्यावर भादंवि कलम ३७६ (२) (एन), ५०६ प्रमाणे धमकी देऊन अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राहुरी पोलीस पथकाने आरोपी ओम फुगारे याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण करीत आहेत.

Web Title: Young girl was abused by threatening to kill her parents

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here