Home पुणे पाठलाग करुन तरुणीचा विनयभंग, तरुणाकडून कटरने वार

पाठलाग करुन तरुणीचा विनयभंग, तरुणाकडून कटरने वार

Breaking News | Pune Crime: कॉलेज तरुणीचा येता जाता लैंगिक उद्देशाने पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याची घटना.

Young girl was molested by chase, stabbed with a cutter by the young man

पिंपरी : कॉलेज तरुणीचा येता जाता लैंगिक उद्देशाने पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. त्याला चारचाकी गाडीतून पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपीने पीडित मुलीच्या गळ्यावर कटरने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या आई-वडील व बहिणीवर वार करुन जखमी केल्याची घटना दिघी पोलीस ठाण्याच्या  हद्दीत 29 एप्रिल रोजी रात्री साडे आठ ते पावणे नऊ या दरम्यान डुडुळगाव व वडमुखवाडी बस स्टॉपजवळ घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत डुडुळगाव येथे राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने मंगळवारी (दि.30) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा बाळासाहेब काळे (वय-28 रा. मोहितेवाडी, शेलपिंगळगाव ता. खेड) याच्यावर आयपीसी 307, 326, 324, 506, 504, 354(ड) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा काळे आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्य़ादी यांच्या मुलीचा कॉलेजला जाता येता लैंगिक उद्देशाने पाठलाग करुन विनयभंग केला. आरोपी मागील एक वर्षापासून मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास देत आहे. दरम्यान, सोमवारी (दि.29 एप्रिल) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी फिर्य़ादी यांच्या घराच्या खाली येऊन घराच्या गॅलरीकडे पाहात उभा होता.

फिर्य़ादी व त्यांची मुली घराच्या खाली गेले. त्यावेळी आरोपी मुलीला काहीतरी करेल या भीतीने फिर्यादी यांनी त्याला पकडले. फिर्यादी व त्यांच्या दोन मुली आणि पत्नीने त्याला चारचाकी गाडीत बसवून दिघी पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. वडमुखवाडी बस स्टॉपजवळ आरोपीने त्याच्याजवळ असलेले कटर फिर्यादी यांच्या मुलीच्या गळ्याला लावून तुला चिरुन टाकतो अशी धमकी देऊन गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी यांनी गाडी थांबवली असता त्याने मुलीच्या हातावर कटरने वार केला. मुलींना वाचवण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपीने त्यांच्या गळ्यावर वार करुन जखमी केले.

तसेच हातातील कटर फिरवत पत्नीच्या गळ्यावर व हातावर मारुन जखमी केले. फिर्यादी आरोपीला पकडून त्याच्याकडून कटर घेत असताना कटर त्यांच्या हाताला कापल्याने ते जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा काळे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Young girl was molested by chase, stabbed with a cutter by the young man

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here