Home Ahmednagar Live News Suicide: शाळेच्या छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Suicide: शाळेच्या छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Young man commits suicide by hanging himself from school roof

Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील बारागांव नांदुर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील विशाल विठ्ठल पवार (वय २२) या तरुणाने गुरुवारी रात्री जिल्हा परिषद शाळेच्या छताला ओढणीच्या सहाय्याने रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समजताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, कृष्णा विघे, सुनील चव्हाण, पोलिस पाटील अशोक पवार अदिंनी धाव घेत मयत तरुणाला खाली उतरवले. युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे आणण्यात आला होता. विशाल पवार या तरुणाने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी १ मुलगी, आई असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास राहुरी पोलीस करत आहे.

Web Title: Young man commits suicide by hanging himself from school roof

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here