तरूणाने मैत्रिणीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
Breaking News | Pune Suicide: रांजणगाव येथे एका तरूणाने मैत्रिणीच्या घरात सलवारच्या साहाय्याने गळफास (Suicide) घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे ब्रेकिंग : रांजणगाव येथे एका तरूणाने मैत्रिणीच्या घरात सलवारच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना २८ जून रोजी पहाटे उघडकीस आली. श्रीराम झूलन भगत कुशावत (वय ४१, रा. बिहार) असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव असून त्याने जीवन का संपवले (Suicide) याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम भगत हा मुळचा बिहार येथील असून तो काही वर्षापूर्वी कुटुंबासह वाळूज महानगरात आला होता. श्रीराम याने पतीपासून विभक्त राहणाऱ्या त्याच्या गावाकडील मैत्रिणीला कंपनीत कामाला लावून देतो असे सांगितले होते. यावरून तिच्या चार मुलांना सोबत घेऊन ती वाळूज महानगरात आली होती. रांजणगावात भाड्याने खोली घेऊन ती राहत होती. तसेच वाळूज येथील एका कंपनीत ती काम करत असे. श्रीराम हा सतत तिच्या घरी जाऊन तिला कंपनीत नेऊन सोडत असे. गुरुवारी (दि. २७) रात्री श्रीराम हा रांजणगाव येथे मैत्रीणीच्या घरी गेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास महिलेला श्रीराम हा घराच्या छताच्या लोखंडी पाईपला सलवारच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे.
Web Title: young man committed suicide by hanging himself in his girlfriend’s house
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study