अहिल्यानगर: पाण्याच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: एका पाण्याच्या खड्ड्यात पडून एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना.
शिर्डी : शिर्डी शहरालगत असलेल्या पिंपळवाडी ते पुणतांबा रोडवरील एका पाण्याच्या खड्ड्यात पडून एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. राहुल दळवी असे तरुणाचे नाव आहे. त्यामुळे शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की पिंपळवाडी शिवारात काही वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने रेल्वे प्रशासनासाठी चार एकर जमिनीत असलेली माती भरावासाठी दिली होती. त्या ठिकाणी ६० ते ७० फूट खोलीच्या आकाराचे मोठे खड्डे झालेले आहे. त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पाणी साचलेले आहे. संरक्षण भित नसल्याने हा मयत तरुण खड्ड्याजवळ बसलेला असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तो पाण्यात बुडाला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलीस व अग्निशामक विभागाला दिली. त्यानंतर अग्निशामक अधिकारी शंकर मिसळ यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक साठे, विलास लासुरे यांच्या पथकाने त्याचा पाण्यात मोठ्या प्रमाणावर शोध घेतला; मात्र रात्र झाल्याने कारवाई थांबवण्यात आली होती. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा या तरुणाचा शोध घेण्यात आला असता त्याचा मृतदेह दुपारी दोन वाजेच्या सुमारास मिळून आला. याप्रकरणी राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: young man died after falling into a water hole
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study