घरात वास्तूशांतीची तयारी, तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू,
वास्तूशांतीनिमित्त तोरण बांधत असताना विजेच्या धक्क्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाल्याची घटना.
सातारा : नवीन घराच्या वास्तूशांतीनिमित्त तोरण बांधत असताना विजेच्या धक्क्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कराड) येथे ही हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आले आहे. संदीप बाजीराव वायदंडे (वय ३९ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने मातंग समाजावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , मसूरमधील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव वायदंडे यांचा संदीप हा कनिष्ठ चिरंजीव होता. मसूरजवळील शहापूर येथे त्याच्या दुकानाशेजारी सीमा लक्ष्मण मंदुळकर यांनी बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीनिमित्त सोमवारी सकाळी घटाला तोरण बांधण्यासाठी संदीप गेला होता. तोरण बांधत असताना घराजवळून गेलेल्या विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. संदीप याचा मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
मातंग समाजातील अत्यंत कष्टाळू, सतत हसतमुख, निर्व्यसनी आणि सर्वांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून संदीपला ओळखले जात होते. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. यावेळी त्याच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
Web Title: Young man died of shock while building a pylon
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App