डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू, डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर | Crime: उपचार सुरु असताना डॉक्टरकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे तरुण रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भोसले हॉस्पिटलमधील रवींद्र भोसले या डॉक्टरविरोधात भिंगार पोलीस ठाण्यात २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश भगवान नागरगोजे याने फिर्याद दिली आहे.
नगर तालुक्यातील वाकोडी येथील तरुण योगेश सुरेश भोसले याला १८ डिसेंबर २०१८ रोजी शहरातील भोसले हॉस्पिटल येथे उपचार करण्यसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २० डिसेंबर २०१८ रोजी योगेश भोसले या तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी भिंगार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याबाबत मयताचे नातेवाईक यांनी जिल्हाशल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार दिली होती.
याबाबत योगेश भोसले याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची तपासी रूग्णालयामार्फत करण्यात आली. याबाबत १ जून रोजी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी डॉक्टर भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Young man dies due to doctor’s negligence crime filed