Home अकोले अकोलेतील तरुणाने शिक्षिकेशी मैत्री करून लैंगिक अत्याचार, तब्बल ११ लाख ८० हजार...

अकोलेतील तरुणाने शिक्षिकेशी मैत्री करून लैंगिक अत्याचार, तब्बल ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक

सोशियल मेडियातून अगोदर मैत्री आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार (sexually abused) करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस.

young man from Akole befriended a teacher and sexually abused him, defrauded him of Rs. 11 lakh 80 thousand

नवी मुंबई: सोशियल मेडियातून अगोदर मैत्री आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अहमदनगर येथील एका तरुणाने सोशल मीडियावरून एका शिक्षिकेशी मैत्री केल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामध्ये ही शिक्षिका पनवेल येथील रहिवासी आहे. तर कृष्णा मेंगाळ वय (३१) असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पाचेदरवाडी येथे राहतो. विशेष म्हणजे, त्याने वेगवेगळ्या बहाण्याने या शिक्षिकेकडून तब्बल ११ लाख ८० हजार रुपये उकळून तिची फसवणूक केली आणि आपल्या गावी पलायन केले आहे. पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्कारासह, फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

वर्षभरापूर्वी कृष्णा मेंगाळ याने या शिक्षिकेशी सोशल मीडियावरून मैत्री करून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. त्यानंतर त्याने पीडित शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. याचदरम्यान, त्याने वेगवेगळ्या बहाण्याने तब्बल ११ लाख ८० हजारांची रक्कम उकळले असल्याचे समोर आले आहे. या तरुणाने पीडित शिक्षिकेशी लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केली त्यांनतर त्या शिक्षिकेने आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याने गेल्या महिन्यात आपल्या मूळ गावी पलायन केले. त्याने शिक्षिकेच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधून शिवीगाळ केली. तसेच तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. अखेर शिक्षिकेने पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील कृष्णा मेंगाळ याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल शहर पोलिस ठाण्यातील महिला हवालदार यांनी त्याच्याकडे चौकशीसाठी संपर्क साधला होता. मात्र, त्याने या महिला पोलिसाशी वारंवार संपर्क साधून शिवीगाळ केली. तसेच पोलिसांवरही दोषारोप केले. पनवेल शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंग, शिवीगाळ करणे, धमकी देणे अशा विविध कलमांखाली दुसरा गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियाचा वापर करून मैत्री नंतर प्रेमसंबंध अत्याचार आणि मग फसवूनक अशा प्रकारच्या एक ना अनेक घटना घडत असतात. मात्र यावर नियंत्रण कधी येणार हा प्रश्न पडत आहे.

Web Title: young man from Akole befriended a teacher and sexually abused him, defrauded him of Rs. 11 lakh 80 thousand

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here