अहमदनगर: फोटो दाखविण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून अत्याचार
Breaking News | Ahmednagar Crime: अल्पवयीन मुलीसोबत -काढलेले फोटो तिच्या घरच्यांना दाखविण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना.
अहमदनगर: अल्पवयीन मुलीसोबत -काढलेले फोटो तिच्या घरच्यांना दाखविण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नगर शहरात घडली. मुळची बिहार व सध्या भिंगार शहरात राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात अत्याचार, पोक्सो, विनयभंग, अपहरण कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरबाज चाँदखान पिंजारी (रा. सौरभनगर, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान वेळोवेळी ही घटना घडली असून सोमवारी (दि. १८) दुपारी एकच्या सुमारास मुलीचा पेपर संपल्यानंतर आरबाज याने तिला बळजबरीने दुचाकीवरून पळवून नेल्यानंतर ही घटना समोर आली आहे. फिर्यादी मुलगी तिच्या शाळेतून घरी जात असताना आरबाज याने तिचा वेळोवेळी पाठलाग केला. मुलीने बोलण्यास व भेटण्यास नकार दिल्यानंतर, ‘तु मला भेटली नाहीस, तर मी तुझ्या घरच्यांना भेटून आपल्या दोघांचे प्रेमसंबंध आहेत, असे खोटे सांगून तुझी बदनामी करील, तसेच तुझे माझ्याकडे असलेले मोबाईलमधील फोटो मी तुझ्या घरच्यांना दाखविल’, अशी धमकी दिली. सुमारे एक वर्षापूर्वी संभाजीनगर रस्त्यावरील एका लॉजवर मुलीला घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. सोमवारी (दि. १८ मार्च) दुपारी एकच्या सुमारास मुलीचा पेपर संपल्यानंतर तिला आरबाज याने बळजबरीने दुचाकीवर बसून फुलसौंदर चौकजवळील लक्ष्मी हॉटेल येथे घेऊन गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान मुलगी हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिने त्याठिकाणी आरडाओरडा करून तेथे असलेल्या नागरिकांना आरबाज त्रास देत असल्याचे सांगितले. त्या हॉटेलमधील तिघांनी आरबाज व मुलीला कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले. तेथे मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरबाज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कैलास कपिले अधिक तपास करत आहेत.
Web Title: young man molested a minor girl by threatening to show her photos
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study