संगमनेरात भाजपचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण
Breaking News | Sangamner Crime: ‘भाजपाचे व अमोल खताळचे स्टेटस ठेवतो का’, असे म्हणत ४० वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना संगमनेर तालुक्यात मिर्झापूर येथून समोर आली आहे.
संगमनेर : ‘भाजपाचे व अमोल खताळचे स्टेटस ठेवतो का’, असे म्हणत ४० वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी काठी, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची तालुक्यातील मिर्झापूर येथे घडली. सदर घटना शनिवारी (दि. १६) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी रविवारी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पंढरीनाथ संपत वलवे (रा. मिर्झापूर, ता. संगमनेर), असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घेतलेल्या त्यांच्या जबाबावरून विजय ज्ञानेश्वर वलवे, गीताराम सयाजी वलवे, राहुल चंद्रभान वलवे, कैलास गणपत वलवे, बाजीराव रामनाथ वलवे, तन्मय विजय वलवे (सर्व रा. मिर्झापूर, ता. संगमनेर) या सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Web Title: young man was beaten up for keeping the status of BJP
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study