अहमदनगर: नदीत तरुण गेला वाहून, शोधकार्य सुरु
Breaking News | Ahmednagar: मुळा धरणाच्या बॅक वाटरमध्ये येणाऱ्या काळू नदीत वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू.
राहुरी : जांभळी येथील बन्सीची वाडी येथे राहणारा अनिल चिमाजी आघान (वय २२) हा तरुण मुळा धरणाच्या बॅक वाटरमध्ये येणाऱ्या काळू नदीत वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. तो वनकुटे (ता. पारनेर) हद्दीतील काळुची वाडी येथे नातलगांकडे गेला होता. दुपारी ३ वाजता परतीच्या मार्गावर असताना अंघोळीसाठी पुलावरून पाण्यात उडी घेतली. परंतु प्रवाह अधिक असल्याने त्याने आरडाओरडा केला.
काही तरुणांनी ते पाहून पाणबुड्यांना बोलावले. सुनील आघान, सुभाष केदार, संदीप भले यांनी पाण्यात उडी घेऊन अनिलला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. वावरथचे माजी सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, जांभळीचे सरपंच शौकत शेख यांनी प्रशासनाला माहिती दिली. सागर बाचकर, किरण जाधव यांसह वावरथ, जांभळी परिसरातील तरुण रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते.
Web Title: young man was carried away in the river, and the search began
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study