Home महाराष्ट्र नातेवाईकाच्या मुलीबाबत ‘नको ते’ बोलल्याने तरूणाचा खून

नातेवाईकाच्या मुलीबाबत ‘नको ते’ बोलल्याने तरूणाचा खून

Breaking News | Pune Crime: एका गाळ्यामध्ये तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात.

young man was killed for talking 'unwanted' about his relative's daughter

पुणे: पुण्यातून गुन्ह्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून खून करण्यात आल्याचा अतिशय खळबळजनक समोर आला आहे.  बसवराज चिदानंद गजंत्रे ( वय 26) असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरानगर परिसरात नियोजित व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी अनेक दुकानांसाठी गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र तेथील एका गाळ्यामध्ये तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी त्या तरूणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे समोर आले. बसवराज चिदानंद गजंत्रे असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याने नातेवाईकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरले होते. तो वाईटसाईट बोलला होता, यामुळेच वाद झाला आणि संशयित आरोपीने त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगड घालून मारहाण केली. यामध्ये बसवराज हा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असे समजते. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला.  याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे.

Web Title: young man was killed for talking ‘unwanted’ about his relative’s daughter

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here