Home संगमनेर संगमनेर: प्रवरा कालव्यात तरुण वाहून गेला

संगमनेर: प्रवरा कालव्यात तरुण वाहून गेला

Breaking News | Sangamner: पुलावरून तोल जाऊन प्रवरा उजव्या कालव्यात पडून तरुण वाहून गेला, शोध मोहीम सुरु.

Young man was swept away in the Pravara Canal

संगमनेर : पुलावरून तोल जाऊन प्रवरा उजव्या कालव्यात पडून तरुण वाहून गेला. सोन्या मच्छिंद्र मोरे (वय २८, रा. ओझर खुर्द) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. सोन्या मोरे हा तरुण शनिवारी सकाळी गावातून घरी जात असतांना ओझर खुर्द प्रवरा उजव्या कालव्यावर पुलावरून तोल जाऊन पाटात पडून वाहून गेला.

या घटनेची माहीती ग्रामस्थांना मिळताच उपसरपंच दगडू शेपाळ, सुंदरनाथ शेजुळ, सोमनाथ बर्ड, बाळासाहेब भागवत, सागर शिंदे, प्रवीण शेपाळ, युवराज बर्डे, कैलास कदम, गोविंद साबळे, संपतराव शिंदेसह मोठ्या प्रमाणात तरुणांनी शोध मोहीम सुरू केली.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

तरुणांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत तर रविवारी सकाळपासून शोध मोहीम सुरू केली. मात्र तो आढळून न आल्याने अखेर प्रवरा डाव्या कालव्याचे पाणी कमी करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती.

Web Title: Young man was swept away in the Pravara Canal

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here