Home अकोले संगमनेरात मुलींची छेड काढणाऱ्या तरूणाला नागरीकांकडून चोप

संगमनेरात मुलींची छेड काढणाऱ्या तरूणाला नागरीकांकडून चोप

Sangamner News: विश्रामगृहासमोर पायी जाणाऱ्या चार मुलींची छेडछाड.

young man who molested girls in Sangamner was caught by the citizens

संगमनेर:  संगमनेर नाशिक-पुणे मार्गावर बस स्थानकानजीक दारूच्या नशेतील तरुणाने सोमवारी संध्याकाळच्या सुमारास विश्रामगृहासमोर पायी जाणाऱ्या चार मुलींची छेडछाड केली. मुलींनी आरडाओरडा केल्याने नागरिकांनी या मद्यपी तरुणाला पकडत चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले.

नाशिक पुणे मार्गावरून शासकीय विश्रामगृहापासून शहरातील चार मुली पायी जात असताना या ठिकाणी असलेल्या व अकोले तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका मद्यपी तरुणाने या मुलींची छेड काढली. घाबरलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी धाव घेत या मद्यपी तरुणाला पकडले. छेड काढणाऱ्या य तरुणाची नागरिकांनी चांगलीच धुलाई केल्यानंतर या संदर्भात शहर पोलिसांना माहिती दिली. तसेच या मद्यपी तरुणाला पकडून ठेवले. दरम्यान गर्दीमुळे घटनास्थळी आलेल्या पोलिसांना आपले वाहन देखील पुढे नेणे अशक्य बनले होते. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी या तरुणाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेत पुन्हा त्या ठिकाणी त्याला पोलिसी खाक्या दाखवला. दरम्यान जागृत नागरीकांनी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यास सामुहिक विरोध केल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल.

Web Title: young man who molested girls in Sangamner was caught by the citizens

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here