Suicide: तरुणी विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
श्रीरामपूर | Suicide: शहरातील मुळा-प्रवरा सोसायटी समोर, चव्हाण हॉस्पिटल)शेजारी असलेल्या सिध्दिविनायक अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या एका विवाहित महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माधुरी उमेश बो-हाडी (वय 25 रा. सिध्दिविनायक अपार्टमेंट) ह्या घरात एकटी असताना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास माधुरी या विवाहितेने फ्लटमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.
माधुरी सकाळी उशिरापर्यत ना उठल्याने शेजारच्याना संशय आला. त्यांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून घराचा दरवाजा उघडला असता माथुरीने गळफास घेतल्याचे दिसून आले . तिचा पती औरंगाबाद येथे गेला होता. त्यास याची माहिती देण्यात आली.
सदर मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तिचा पती उमेश बोर्हाडी यास पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून त्याची चौकशी सुरु केली. माधुरीने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.
Web Title: Young woman commits suicide by strangulation