Home अहमदनगर तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, बोगस डॉक्टरला अटक

तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, बोगस डॉक्टरला अटक

Ahmednagar News: रुईछत्तिशी येथील प्रकार : पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता दवाखाना, बोगस डॉक्टरला अटक (arrested).

Young woman dies during treatment, bogus doctor arrested

अहमदनगर : बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या एका १९ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) रुईछत्तिशी (ता. नगर) गावात घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान आरोग्य विभागाच्या पथकाने गावात येऊन चौकशी केली असता हा डॉक्टरच बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, त्याला अटक करण्यात आली नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथे अशा पत्र्याच्या शेडमध्ये बोगस डॉक्टरचा दवाखाना सुरु आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ज्ञानेश्वर निवृत्ती पवार (६३, रा. साकत, ता. नगर) असे अटक केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. तालुक्यातील रुईछत्तिशी गावात डॉ. डी. बी. बोस नावाने एका पत्र्याच्या शेडमध्ये दवाखाना चालविला जातो. या गावातील सोसायटीचे संचालक शंकर फुलमाळी यांनी त्यांच्या मुलीला गावातील बाळंतपणासाठी दाखल केले होते.

तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांच्या आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. पथकाने तरुणीचा मृत्यू झालेल्या दवाखान्याची चौकशी सुरू केली. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरकडे कुठली वैद्यकीय पदवी प्रकार समोर आला. आहे, तो वापरत असलेले औषधे कुठली आहेत, याबाबत चौकशी केली असता डॉक्टर पवार हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पवार याच्याकडे कुठली पदवी नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

यावरून पवार हा बोगस डॉक्टर असल्याची आरोग्य अधिकारी मांडगे यांची खात्री झाली. त्यांनी तत्काळ नगर तालुका पोलिस ठाण्याला माहिती  दिली. नगर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक युवराज चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत बोगस डॉक्टर याला अटक केली असून, त्याला नगर तालुका पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

बोगस डॉ. पवार यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक युवराज चव्हाण व आरोग्य अधिकारी डॉ.मांडगे करत आहेत. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लहू चव्हाण, वाळकी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तालुका स्तरावरून नियंत्रण समिती स्थापन करून कोणत्या हॉस्पिटलला कोणती औषधे देण्याचा आणि कोणत्या डॉक्टरांना कोणते उपचार करण्याचा परवाना आहे, याची सखोल चौकशी केली जाईल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मांडगे यांनी सांगितले.

Web Title: Young woman dies during treatment, bogus doctor arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here