Home क्राईम पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

Pune Crime: पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या तरुणीवर बलात्कार (Raped).

young woman was raped by the lure of police recruitment

पुणे: पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अक्षय चंद्रशेखर प्रधान (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे  नाव आहे.

याबाबत एका ३१ वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी पोलीस भरतीची तयारी करत आहे. ती वानवडीतील एका संस्थेत जायची. तेथे तिची प्रधानशी ओळख झाली होती. राजपत्रित अधिकारी असल्याची बतावणी प्रधानने तरुणीकडे केली होती.

पोलीस भरतीचे आमिष दाखवून प्रधानने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केल्यानंतर प्रधानने तिला धमकावून बलात्कार केला. तरुणीला धमकावून त्याने एक लाख ३० हजार रुपये उकळले.

आरोपी प्रधान याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अन्य उमेदवारांकडून पैसे उकळल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास वानवडी पोलीस करीत आहे.

Web Title: young woman was raped by the lure of police recruitment

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here