Home महाराष्ट्र टॅक्सी चालकाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार

टॅक्सी चालकाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार

Breaking News | Mumbai Crime: एका टॅक्सी चालकाने तरूणीला पुढे बसवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

young woman was sexually assaulted by a taxi driver

मुंबई : काल दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना मुंबईत असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका टॅक्सी चालकाने तरूणीला पुढे बसवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेने मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय तरुणी कॉलेजला जात असताना टॅक्सी चालक जग्गनाथ काळे (४७) याने तरुणीवर कोणीतरी जादूटोण्याचा केल्याचा बनाव रचत तिला पुढे बसवले. त्यानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, तरुणीच्या तक्रारीनंतर याप्रकरणी नराधम टॅक्सी चालकावर काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी धक्कादायक घटना समोर आली होती. बोरिवली येथील ९ व १० वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांच्या पित्याला अटक केली आहे. २०१९ पासून हा प्रकार सुरू असल्याचे मुलींच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ४० वर्षीय आरोपी २०१९ पासून पीडित मुलींवर अत्याचार करीत होता. त्याला विरोध केला असता आरोपीने पत्नीला मारहाण केली. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळून मुलींच्या आईने याप्रकरणी बोरिवली पोलिसांकडे तक्रार केली.

Web Title: young woman was sexually assaulted by a taxi driver

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here