लिव्ह- इन- रिलेशनशिपमध्ये राहत असताना युवतीच्या छातीत धारधार शस्त्राने भोसकून खून
Breaking News | Kolhapur Crime: लिव्ह- इन- रिलेशनशिपमध्ये राहून देखील लग्नाला नकार देणाऱ्या युवतीच्या छातीत धारधार शस्त्राने भोसकून अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक घटना.
कोल्हापूर : लिव्ह- इन- रिलेशनशिपमध्ये राहून देखील लग्नाला नकार देणाऱ्या युवतीच्या छातीत धारधार शस्त्राने भोसकून अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना करवीर तालुक्यातील सरसोबतवाडी येथे घडली असून समीक्षा भारत नरसिंगे उर्फ बागडी (वय 23, रा. जयभवानी गल्ली) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे तर संशयित आरोपी सतिश मारूती यादव ( वय 25, रा. शिवाजीपेठ, कोल्हापूर) हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जय भवानी गल्ली परिसरात मयत समीक्षा ही आपली आई आणि लहान बहीण भावासोबत राहत होती. 2018 साली समीक्षाच लग्न लक्षतीर्थ वसाहत परिसरातील मुलासोबत झालं होतं. मात्र लग्नानंतर तीन महिन्यात नवऱ्याशी पटत नसल्याने नवऱ्याला सोडून ती आपल्या आई, बहीण, भावासोबत कसबा बावड्यातील जय भवानी गल्ली येथे राहत होती. तर ती गेल्या काही वर्षापासून इव्हेंट मॅनेजमेंटच काम करत होती. याच वेळी एका इव्हेंट च्या माध्यमातून तिची ओळख तेलंगणा येथून कोल्हापुरात कामानिमित्त आलेली तरुणी आयशू आंपले आणि संशयित कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे राहणारा सतिश यादव या दोघांशी झाली. गेल्या तीन महिन्यांपासून तिघेजण करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील एका टू बीएचके फ्लॅटमध्ये लिविंग रिलेशनशिप मध्ये राहत होते. मात्र गेल्या महिन्याभरापासून समीक्षा आणि संशयित आरोपी सतिश यादव यांच्यात वारंवार वाद होत होता. आठ दिवसांपूर्वी या वादाला कंटाळून समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू दोघी कसबा बावडा येथील आईच्या घरी राहण्यास गेले होते. तर संशयित आरोपी सतीश यादव हा समीक्षाला वारंवार फोन करून भेटण्यासाठी आग्रह करत होता.
मंगळवारी दुपारी समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू दोघे आपलं सामान आणण्यासाठी फ्लॅटवर आले होते. दोघेजण फ्लॅटवर आल्याची माहिती संशयिताला मिळताच तो फ्लॅटवर आला. रागाच्या भरात त्याने समीक्षाला एका खोलीत नेऊन तिच्या छातीत चाकूने वार केला. या हल्ल्यात समीक्षा जागेवरच कोसळली. हा हल्ला इतका भीषण होता की चाकू तरुणीच्या बरगड्यात अडकला होता. तर संशयित सतिश यादव याने खोलीला बाहेरून कडी लावून दुचाकीवरून पसार झाला.
यावेळी घाबरलेल्या आयशूने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र बाहेरून दरवाजा बंद असल्याने तिला दरवाजा उघडता आला नाही. यानंतर आयशूने वसगडे येथील तिचा मित्र अभिषेक सोनवणे याला फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अभिषेक घटनास्थळी दाखल होत दरवाजा उघडला. यावेळी समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तर आयशू रडत होती. अभिषेकने त्वरित एका ऑटो रिक्षातून समीक्षाला जवळील खाजगी रुग्णालयात नेला. मात्र समीक्षाची प्रकृती गंभीर असल्याने तिला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आल. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने समीक्षाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितल. हे खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. समीक्षा चे नातेवाईक आणि मित्र परिवार सीपीआर रुग्णालय परिसरात दाखल झाला.
लेकीचा खून झाल्याचे कळतात आईचा आक्रोश पाहून अनेकांचा हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी पोलिसांचा फौज फाटा घेऊन रुग्णालयात दाखल झाले. तसेच करवीर पोलीस ठाणे, गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करत. पसार झालेल्या संशयित आरोपी सतिश यादव यांचा शोध पोलिसांनी सुरू केलाय.
Breaking News: young woman was stabbed to death in the chest with a sharp weapon