तुझा व्हिडीओ व्हायरल करेन, धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Breaking Mumbai Crime: मित्रासोबत तुझा व्हिडीओ पालकांना दाखवेन, तो व्हायरल करेन अशी धमकी देत एका 53 वर्षांच्या नराधमाने अवघ्या 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना.
मुंबईतील अंधेरी भागात अशीच एक आणखी दुर्दैवी घटना घडली आहे. मित्रासोबत तुझा व्हिडीओ पालकांना दाखवेन, तो व्हायरल करेन अशी धमकी देत एका 53 वर्षांच्या नराधमाने अवघ्या 14 वर्षांच्या वर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झालं आहे.
अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी अवघी 14 वर्षांची असून ती मुंबईत आई-वडिलांसह राहते. आरोपी हा 53 वर्षांचा असून तो तिचा परिचितच आहे. त्याने त्या मुलीला एका तरूणासोबत मैत्री करण्यास प्रवृत्त केलं. मात्र त्यानंतर त्याच्यासोबत त्या मुलीचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ तुझ्या आई-वडिलांना दाखवेन, सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. आणि त्याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने ही माहिती मालकांना देताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी अखेर डी. एन. नगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. अत्याचार करणारा आरोपी आणि मुलीवर वॉच ठेवणारा दुसरा आरोपी अशा दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी डी.एन. नगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या आधारे अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपीसह वॉच ठेवणाऱ्या आरोपीलाही अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो अंतर्गत कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
Web Title: your video viral, threatening and abusing a minor girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study