Home पुणे संगमनेर तालुक्यातील दुचाकी चोरणारा तरुण जेरबंद

संगमनेर तालुक्यातील दुचाकी चोरणारा तरुण जेरबंद

Breaking News | Sangamner: नागरिकांच्या मदतीने दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Youth Arrested for stealing two-wheeler from Sangamner taluka

ओतूर: येथील पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जेरबंद केले आहे. नवनाथ सुरेश खंडागळे (वय १८, रा.घारगाव ता.संगमनेर जि.अहमदनगर) असे अटक तरुणाचे नाव असून याबाबत किसन नाथा कडाळे यांनी ओतूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की नवनाथ खंडागळे हा युवक रोहोकडी येथील किसन कडाळे यांच्या घरा समोर लावलेली दुचाकीचे रात्री साडे दहा दरम्यान हॅन्डल लॉक तोडून गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न करताना असताना नागरीकांनी पाहिले. त्यानंतर त्यास पाठलाग करून पकडून ओतूर पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर घटनेचा अधिक तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आशा भवारी करत आहे.

Web Title: Youth Arrested for stealing two-wheeler from Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here