Home अहमदनगर अहमदनगर: गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह युवक ताब्यात

अहमदनगर: गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह युवक ताब्यात

Breaking News |  Ahmednagar:  गदेवाडी फाटा येथे एका युवकास गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसासह ताब्यात.

Youth arrested with Gavathi katta and live cartridges

शेवगाव: पोलीस उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी खानापूर शिवारातील गदेवाडी फाटा येथे एका युवकास गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. अक्षय मेशोक इंगळे (वय २६), रा. गदेवाडी), असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत पोकॉ. बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुप्त बातमीदारामार्फत अक्षय मेशोक इंगळे रा. गदेवाडी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर हा गदेवाडी फाटा, खानापूर, ता.शेवगाव येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा त्याच्या कब्जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, पोहेकॉ. चंद्रकांत कुसारे, आर. आर. अकोलकर व पोलिस पथक रात्री ९ वाजण्याच्या सुमारास खाजगी वाहनाने गदेवाडी फाटा, खानापुर ता. शेवगाव येथे गेले असता, अक्षय मेशोक इंगळे (वय २६), रा. गदेवाडी ता. शेवगाव, याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) व ३ जिवंत काडतुसे मिळून आली. या वेळी पोलिसांनी अक्षय मेशोक इंगळे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Youth arrested with Gavathi katta and live cartridges

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here