अहिल्यानगर: रेल्वे समोर मारली उडी, तरुणाची आत्महत्या
Breaking News | Ahilyanagar: तरुणाने धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची घटना, मृतदेह ठेवला वांबोरी पोलिस चौकी समोर.
राहुरी : तरुणाने धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची घटना बांबोरी परिसरात गुरुवारी (दि. २४) पहाटे घडली. निखिल देवकर (वयः २३) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान निखिल यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी देवकर यांच्या नातेवाइकांनी वांबोरी पोलिस चौकीसमोर मृतदेह ठेवत उशिरापर्यत ठिय्या मांडला.
वांबोरी येथे शुकवारी (दि.१८) पहाटे सहा जणांच्या टोळक्याने एका पेट्रोल पंपावर कामगारांना शिवीगाळ करून घुडगूस घातला होता. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात निखिलसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. निखिल देवकर याच्यावर दाखल गुन्हा खोटा आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्यात आली.
मानसिक तणावामुळे निखिल याने आत्महत्या केली. असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह वांबोरी पोलिस चौकीसमोर ठेवण्यात आला.
Web Title: Youth commits suicide by jumping in front of train