Home संगमनेर संगमनेर: तरुणाची आत्महत्या, पत्नी व सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

संगमनेर: तरुणाची आत्महत्या, पत्नी व सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

Sangamner Suicide: तरुणाने ६ मार्च २०२५ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

Youth commits suicide, case registered against wife and in-laws

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील विजय भास्कर जोशी या तरुणाने ६ मार्च २०२५ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याबाबत नुकताच आश्वी पोलीस ठाण्यात मयत तरुणाची पत्नी, सासरा, सासू व मेहुणा यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्ता केल्याप्रकरणी गुरुवारी (दि. १३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयत तरुणाची आई संगीता जोशी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा विजय भास्कर जोशी (वय २८) यांचा विवाह खांबे येथील हरिभाऊ जोरी यांच्या मुलीबरोबर १९ जून २०२२ रोजी त्यांच्या वस्तीवर झाला होता. लग्नानंतर सून, मुलगा व आम्ही एकत्र राहत होतो. मुलगा विजय हा जागरण गोंधळात वाघ्या म्हणून काम करत असे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, जागरण गोंधळात वाघ्याचे काम करण्यावरून सून व मुलामध्ये वाद सुरू झाले. त्यामुळे मुलगा विजय हा तणावात राहत असे.

दि. २ मे २०२४ रोजी मी, पती व मुलगा असे तिघे बहीणीच्या मुलीच्या लग्नासाठी बाहेरगावी गेलो होतो. त्यावेळी माझी सून पूजा एकटीच घरी होती. लग्न झाल्यानंतर आम्ही घरी आलो. दि. ३ मे २०२ रोजी मुलगा व पती घरी नसताना, माझा भाऊ पांडुरंग जोरी हा घरी आला व आमची सून पूजा हिला आम्हाला कोणालाही काही न सांगता घेऊन गेला.

त्यानंतर मुलगा विजय याला सून पूजाने शिबलापुर येथे भेटायला बोलावले. यावेळी त्यांच्यात वाद होऊन सुनाने घटस्फोटाची मागणी करून जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर ३ जून २०२४ रोजी मी नातेवाईकांसमवेत खांबे येथे गेलो होतो. यावेळी सून पूजाने नांदायला येण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयातून रीतसर घटस्फोट घेण्याबाबत चर्चा झाली आणि सर्व संमतीने पूजाला उदरनिर्वाहासाठी २ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे न्यायालयात घटस्फोट मिळण्याबाबत दावा दाखल करण्यात आला होता. के सची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०२५ रोजी होती. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे सून पूजाला २ लाख ५० हजार रुपये द्यायचे होते. मात्र, त्या दिवशी पूजा न्यायालयात गैरहजर राहिली.

त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी मुलगा विजय याने सांगितले की, पूजा व तिचा भाऊ प्रसाद यांनी १० लाख रुपये दिले, तरच घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात येऊ, असे म्हटले होते. तसेच, पैसे नाही दिले, तर तुम्हा सर्वांचा काटा काढू, असा दम देखील दिला होता. तेव्हापासून माझा मुलगा घाबरलेला होता. त्यानंतर दोन ते तीन वेळा शिबलापुर येथे झालेल्या भेटीदरम्यान, मुलगा विजय याला सून, तिचा भाऊ, तिचे वडील व आई यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मुलगा विजय याने ६ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता, घरी कोणी नसताना, घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. असे दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३५/२०२५ नुसार भादंवि कलम १०८, ३५२, ३५१(२), (३) ३(५) प्रमाणे पत्नी पूजा जोशी, सासरे हरिभाऊ जोरी, सासू मंदा जोरी, मेहुणा प्रसाद जोरी (सर्व रा. खांबे, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे व त्यांचे सहकारी करत आहेत.

Web Title: Youth commits suicide, case registered against wife and in-laws

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here