Home पुणे ऑनलाईन गेमचे पैसे मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या

ऑनलाईन गेमचे पैसे मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या

Breaking News | Shirur Suicide: एका ३५ वर्षीय तरुणाने ऑनलाईन गेमचे पैसे मिळत नसल्याने व मित्रांकडील उसने पैसे परत करता न आल्याने नैराश्यापोटी एकाने गळफास घेत आत्महत्या.

Youth commits suicide due to not getting money for online games

कोरेगाव भीमा:  कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वाडा पुनर्वसन येथील एका ३५ वर्षीय तरुणाने ऑनलाईन गेमचे पैसे मिळत नसल्याने व मित्रांकडील उसने पैसे परत करता न आल्याने नैराश्यापोटी एकाने गळफास घेत आत्महत्या केली.

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किशोर सुरेश पाटील (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अतुल सुरेश पाटील (वय३५ रा. वाडा पुनर्वसन, नक्षत्र हौसिंग सोसायट) येथे पत्नी व दोन मुलींसह राहण्यास आहे.

दि.३१ मे रोजी रात्रौ १०:३० वा. चे सुमारास फिर्यादी कामावरून घरी आले असता, अतुल फोन उचलत नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले असता फिर्यादी पाटील यांनी फोन केला. परंतु, त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्याचा शेजारी रामकरण कुमावत याला फोन केला व त्याला त्याचे रूमला जायला सांगितले त्याने त्याचा दरवाजा खुप वेळा वाजविला परंतु अतुल याने दरवाजा उघडला नाही खिडकीतून पाहिले असता अतुल पाटील याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.

Web Title: Youth commits suicide due to not getting money for online games

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here