राहत्या घरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Ahmednagar Suicide: तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील सोमनाथ ज्ञानदेव कडू (वय 40) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमनाथ हा वडाळा महादेव येथील जुनी ग्रामपंचायत चौक शेजारी राहत होता. आई बाहेरगावी असल्याने तसेच घरात कोणी नसल्याने त्याने राहत्या घरामध्येच गळफास घेतला. त्याच्या आत्महत्यामागील कारण मात्र समजू शकले नाही.
याबाबत नातेवाईक व ग्रामस्थ यांनी घटनेची माहिती येथील कामगार पोलीस पाटील मार्था राठोड यांना कळविली. त्यांनी घटनास्थळी भेट देत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कळविले. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड, प्रवीण कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून नातेवाईक ग्रामस्थ यांच्या मदतीने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात पाठविला.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 126/ 2022 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचेकडून करण्यात येत आहे.
Web Title: Youth committed suicide by hanging himself
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App