अहिल्यानगर: बसखाली चिरडून युवकाचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: अहिल्यानगर ते श्रीगोंदा बसखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू.

श्रीगोंदा : अहिल्यानगर ते श्रीगोंदा बसखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. आशुतोष आबासाहेब भद्रे (वय १८, रा. पारगाव सुद्रिक) असे मृताचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास श्रीगोंदा शहराजवळील बोरुडे-मखरेवाडी शिवारात झाला.
श्रीगोंदा आगाराची बस (एमएच १४ बीटी ३२३०) अहिल्यानगरकडून श्रीगोंद्याकडे येत असताना भद्रे याच्या मोटारसायकलला जोरदार धडक बसली. त्यात आशुतोष भद्रे हा जागीच ठार झाला. आशुतोष हा श्रीगोंदा येथील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होता. या घटनेने पारगाव सुद्रिक गावावर शोककळा पसरली आहे.
Breaking News: Youth dies after being crushed under bus


















































