Home संगमनेर संगमनेर: प्रवरा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

संगमनेर: प्रवरा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

Breaking News | Sangamner: पुणे रोडवरील मोठ्या पुलाजवळील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना. (dies)

Youth dies after drowning in Pravara riverbed

संगमनेर: शहरातून जाणाऱ्या पुणे रोडवरील मोठ्या पुलाजवळील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. गौतम उर्फ शाहरुख दगडू यरमल (वय ३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो संगमनेर खुर्द येथील असल्याचे समजते.

भंडारदरा व निळवंडे धरणातून सध्या प्रवरा नदीला शेतीचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. रविवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक रोड वरील प्रवरा नदीच्या मोठ्या पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यात वाहून चालला असल्याचे नदीवर पोहणाऱ्या तरुणांच्या निदर्शनास आले. ही माहिती संगमनेर शहर पोलिसांना देण्यात आली.

संगमनेर शहर पोलिस स्टेशनचे लक्ष्मण भांन्सी, उपनिरीक्षक सुनील माळी, पो. कॉ शरद के पवार, वाहन चालक मोरे हे तातडीने प्रवरा नदीच्या मोठ्या पुलावर आले. त्यावेळी संबधित तरुणाचा मृतदेह नदीच्या छोट्या पुलावरून मोठ्या पुलापर्यंत वाहत आला असल्याचे पोहणाऱ्या तरुणांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत त्या तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. हा तरुण संगमनेर खुर्दचा येथील असल्याचे प्रथमदर्शनी समजले. त्यानुसार पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी संगमनेर खुर्दचे कामगार पोलिस पाटील किरण गुंजाळ व पत्रकार शौकत पठाण यांना संपर्क करून घटनास्थळी बोलावले. कामगार पोलिस पाटील गुंजाळ यांनी हा मृतदेह गौतम येरमल याचा असल्याचे ओळखले. तो घरी जात असताना पुलावरुन तोल जावून नदीपात्रात पडल्याचे सांगितले जाते.

यरमल या तरुणाचा मृतदेह घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलिस करत आहेत.

Web Title: Youth dies after drowning in Pravara riverbed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here